Weather Update: राज्यातील उष्णतेची लाट तीव्र; चंद्रपूर 42, पुणे 40 अंशांवर

होळीनंतर मात्र राज्याच्या तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ
Heat wave in the state
राज्यातील उष्णतेची लाट तीव्र; चंद्रपूर 42, पुणे 40 अंशांवरPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: राज्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र झाल्याने काही भागात अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारी काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते. दरम्यान, चंद्रपूरचे तापमान 42, तर पुणे शहराचे 40 अंश सेल्सिअसवर गेले होते. गेले दोन महिने राज्यातील उष्ण तापमान वाढतच आहे.

होळीनंतर मात्र राज्याच्या तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्याने उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली असून, राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही भागांत अत्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्याचा सुधारित अंदाज येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल.

शनिवारचे कमाल तापमान

मुंबई 33.3, पुणे (लोहगाव) 40.3, चंद्रपूर 42, अकोला 41.3, वर्धा 41, जळगाव 38.5, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 32.5, मालेगाव 40, नाशिक 36.9, सातारा 37.7, सोलापूर 40.3, धाराशिव 38, परभणी 39, ब्रह्मपुरी 40.8, गोंदिया 38.8, नागपूर 40.2, वाशिम 39.8, यवतमाळ 39.8.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news