हर्षवर्धन पाटील यांचा भाजपला रामराम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Harshvardhan Patil : पक्ष प्रवेशाची तारीख शरद पवार ठरवतील
harshavardhan patil
हर्षवर्धन पाटीलPudhari
Published on
Updated on

इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला असून प्रवेशाची तारीख ज्येष्ठ नेते शरद पवार,खा.सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ठरवतील असे आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

ते म्हणाले आम्ही आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेतला असल्यामुळे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिलेला आहे. पवार घराण्याचे आणि पाटील घराण्याचे गेल्या साठ वर्षांपासून अतिशय चांगले आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे तशी काही अडचण नाही तसेच राजकारणामध्ये शत्रू मित्र असे काही नसते.

हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षांमध्ये जातील याची अटकळ गेल्या अनेक दिवसापासून केली जात होती. महायुतीच्या जागा वाटपामध्ये इंदापूरची विधानसभेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे भाजपची उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांना मिळू शकत नव्हती त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षात जाणार हे निश्चित झालेले होते.

गुरुवारी त्यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर आज त्यांनी इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांना तुतारी मध्ये प्रवेश करण्याचे आग्रह कार्यकर्त्यांनी धरला त्यापूर्वी गेले महिनाभर पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये संवाद मेळावे आयोजित केले होते या संवाद मेळाव्यातही त्यांच्या कार्यकर्त्यांचा पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी असा आग्रह होता, त्याचवेळी त्यांनी आपण जनतेचा आग्रह मोडणार नाही असे जाहीर केले होते त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांच्या पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

शरद पवार यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांचा मात्र पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गोविंदबाग या बारामतीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या भावना त्यांना कळविलेल्या होत्या त्यानंतरही शरद पवार यांनी पाटील यांना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे हा असंतोष कसा शांत करायचा याचे आव्हान पाटील आणि शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news