पुणे : पुढारी वृत्तसेवा : अल निनोची स्थिती मेअखेरपर्यंत सक्रिय राहणार असल्याने यंदाचा उन्हाळा दरवर्षीच्या तुलनेत कडक राहणार आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत उष्णतेच्या लाटांची संख्या नेहमीच्या तुलनेत जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी दिला. यंदा एल निनोमुळे पाऊसमान बिघडले. उत्तर भारत वगळता पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तसाच प्रकार उन्हळ्याच होईल, असा अंदाज आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यात फक्त वायव्य, ईशान्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारताचे क्षेत्र अपवाद राहील. तेथे तापमान सामान्यपेक्षा कमी राहील, असेही अंदाजात म्हटले आहे.
शुक्रवारी पुणे शहरातील काही भागांत सकाळी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी उपनगरातील काही भागांत रिमझिम पाऊस झाला, तर सायंकाळी शिवाजीनगर भागात पावसाने रस्ते ओलेचिंब केले. त्यामुळे कमाल तापमान 38 अंशावरून 36 अंशावर खाली आले.
शुक्रवारी पुणे शहरातील काही भागांत सकाळी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी उपनगरातील काही भागांत रिमझिम पाऊस झाला, तर सायंकाळी शिवाजीनगर भागात पावसाने रस्ते ओलेचिंब केले. त्यामुळे कमाल तापमान 38 अंशावरून 36 अंशावर खाली आले.
हिमालयात तापमान सामान्य राहील. मात्र, त्याखाली संपूर्ण देशात मार्च ते मेअखेरपर्यंत कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यातं उष्णतेच्या लाटांची संख्या आणि कालावधी दरवर्षीच्या उन्हाळ्यात जास्त राहील.
पश्चिम हिमालयीन प्रदेश, र्नैऋत्य द्वीपकल्प आणि पश्चिम किनारा वगळता ईशान्येकडील बहुतांश भागांत उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मार्चमध्येच महाराष्ट्र तापण्यास सुरुवात झाली आहे. हे तापमान एप्रिल व मेपर्यंत सामान्यपेक्षा जास्त राहील. तसेच पाऊसही सामान्यच राहील, असाही अंदाज आहे.
राज्यातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होण्यास सुरुवात झालेली असताना शुक्रवारी अचानक राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. शनिवारी 2 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा