अतिक्रमणांवर हातोडा; कोथरूडला 30 हजार स्क्वेअर फूट बांधकाम पाडले

अतिक्रमणांवर हातोडा; कोथरूडला 30 हजार स्क्वेअर फूट बांधकाम पाडले

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा : कोथरूड डेपो परिसरात चौकातील मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंना दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहनचालक, शालेय मुलांची वाहतूक करणारी वाहने, तसेच रस्त्यावर चालणारे नागरिक या नाहक त्रास सहन करावा लागत होता. बुधवारी (दि. 27) अतिक्रमण विभागाकडून पीएमटी डेपो चौक डावी व उजवी भुसार कॉलनी येथे कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बांधकाम विभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.

बांधकाम विभागाचे उपअभियंता निवृत्ती उतळे, कनिष्ठ अभियंता योगेश भोसले, अतिक्रमण निरीक्षक सुभाष जगताप, सहायक अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर बावधने, किरण पाटील, नंदू दाते उपस्थित होते. या वेळी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या हातगाडी व्यावसायिक, पदपथावर वाढीव बांधकाम केलेले दुकानदार व व्यावसायिकांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली.

पीएमटी डेपो चौकापासून डावी व उजवी भुसार कॉलनी येथील अनधिकृत शेडवर कारवाई फ्रंट मार्जिन व साईड मार्जिनमधील हातगाडी, लोखंडी काऊंटर, स्टील काऊंटर, शेड अशा एकूण 2 हातगाड्या, 6 लोखंडी काऊंटर, 5 स्टील काऊंटर, लाकडी काऊंटर व इतर 12 असे एकूण 25 ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी 21 बिगारी सेवक व 4 ट्रक, 2 जेसीबी, 6 पोलिस कर्मचारी व 11 महाराष्ट्र सुरक्षा बल जवान असे कर्मचारी व मोठ्या प्रमाणात फौजफाट्यासहित ही कारवाई करण्यात आली. यात अंदाजे 30 हजार स्क्वेअर फूट कच्चे-पक्के बांधकाम काढण्यात आले असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.

अतिक्रमण हटवल्याने रहदारीतील अडथळे दूर होतील. पुन्हा अतिक्रमण झाल्यास ते पुन्हा काढण्यात येईल.

– किरण पाटील, अतिक्रमण निरीक्षक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news