वेल्हे: तोरणा, राजगड व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यांवर संततधार सुरू असून, त्याचा सकारात्मक परिणाम गुंजवणी धरण पाणलोटक्षेत्रावर दिसून येतो आहे. मंगळवारी (दि. 1) सकाळी धरणाचा पाणीसाठा 2.34 टीएमसी म्हणजेच 63.31 टक्क्यांवर पोहोचला.
गुंजवणी धरणावर सोमवार (दि. 20) पासून मंगळवारी सकाळपर्यंत 34 मि.मी पावसाची नोंद झाली. तर 1 जूनपासून आतापर्यंत 924 मि.मी इतका पाऊस झाला आहे. धरणाचे उपअभियंता नयन गिरमे यांनी ही माहिती दिली. (Latest Pune News)
कोदापूर, अंत्रोली, निवी, कानंद, घेंवडे भट्टी, घिसर-रायदांडवाडी घाटमाथ्यावर दि. 15 मेपासून पावसाची नियमित नोंद होत आहे. सततच्या पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे गुंजवणी धरण जुलैच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे.