Gunjavani Dam water storage: गुंजवणी धरणात ९० टक्के पाणीसाठा; तोरणा खोऱ्यात रिमझिम सुरूच

धरणातून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात गुंजवणी धरण माथ्यावर ५ मिलिमीटर पाऊस पडला.
Gunjavani Dam Water Level
Gunjavani Dam Water LevelPudhari
Published on
Updated on

वेल्हे: तोरणा तसेच राजगड खोऱ्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. धानेप (ता. राजगड) येथील गुंजवणी धरणात गुरुवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता ३.३५ टीएमसी म्हणजे ९०.५९ टक्के साठा झाला होता.

धरणातून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात गुंजवणी धरण माथ्यावर ५ मिलिमीटर पाऊस पडला.

Gunjavani Dam Water Level
Revenue Officials Transfer: अधिकाऱ्यांकडून गैरवापर; शिक्षा फक्त बदली!महसूल संहितेतील १५५ कलमाबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

दि. १ जूनपासून १३ ऑगस्टपर्यंत धरण माथ्यावर १ हजार ७८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुंजवणी धरणाचे उप अभियंता नयन गिरमे म्हणाले, की धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.

Gunjavani Dam Water Level
Central Railway Reel Stunts: धावत्या ट्रेनमध्ये आणि रुळांवर रील्स, फोटोशूट बनवणे पडेल महागात; रेल्वेकडून कारवाईचा इशारा

रिमझिम पावसामुळे पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे नियोजनानुसार धरणात १०० टक्के साठा होईल. दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्याने राजगड-तोरणा खोऱ्यातील नद्यांसह ओढे-नाल्यांचे प्रवाह मंदावले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे ओढे-नाले नद्यांना पूर आले आले होते. असे असले तरी रिमझिम पावसामुळे धरणात पाण्याची आवक मंदगतीने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news