Maharashtra Budget 2026 | ग्रीन फिल्ड महामार्ग ठरणार विकासाचे ग्रोथ इंजिन

पुणे, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाच्या विकासाला गती मिळणार
Maharashtra Budget 2026  |
Maharashtra Budget 2026 | ग्रीन फिल्ड महामार्ग ठरणार विकासाचे ग्रोथ इंजिन
Published on
Updated on

पुणे : गेली काही वर्षे प्रचंड चर्चेत असलेल्या ग्रीन फिल्ड मार्गासह उन्नत मार्गांना अखेर राज्य शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची घोषणा मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यात मुंबईच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे आगामी काळात विकासाचे ग्रोथ इंजिन कसे ठरतील हेच त्यांनी सांगितले.

शुक्रवारी (दि. 6) राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 2 ते 3.25 असा तब्बल दीड तास सादर केला. यात त्यांनी राज्यातील सर्वच पायाभूत सुविधांच्या कामांची प्रशासकीय मान्यता झाल्याची घोषणा केली. मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यातील रस्त्याचे जाळे विस्तारून ते विकासात कसे निर्णायक ठरणार आहे, याचा रोड मॅप सादर केला.

असे होणार महामार्गाचे विस्तारीकरण

* समृद्धी महामार्ग :- नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि वाढवन बंदराला जोडण्यासाठी तवा-भरवीर मालवाहतूक कॉरिडॉर.

* मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मार्गांवरील दोन्ही बाजू विकसित होणार.

* राज्यातील 1 हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्यांनी जोडणार, आशियाई बँकेच्या मदतीने 4 हजार 500 कोटींच्या कामांना मंजुरी.

* तळेगाव-चाकण उन्नत मार्गासाठी (25 किलोमीटर) 6 हजार 499 कोटी रुपये मंजूर.

* हडपसर ते यवत सहापदरीकरण (1.50 किलोमीटर) कामासाठी 5 हजार 262 कोटी रुपये मंजूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news