Rise Up: 'राईज अप महिला ॲथलेटिक्स' ला उत्स्फूर्त प्रतिसाद

2250 खेळाडूंचा सहभाग; पूर्वा खोमणे, आरोही गारगोटे यांना सुवर्णपदक; रोख पारितोषिकांसह मेडल आणि गिफ्टची लयलूट
Rise Up
'राईज अप महिला ॲथलेटिक्स' ला उत्स्फूर्त प्रतिसादPudhari
Published on
Updated on

Pune News: ‘दै. पुढारी’च्या वतीने आयोजित ‘राईज अप महिला अ‍ॅथलेटिक्स सीझन-3’च्या स्पर्धेमध्ये 9 वर्षांखालील गटाच्या 30 मीटर आणि 50 मीटर प्रकारात पूर्वा खोमणे हिने, तर 100 मीटर आणि लांब उडी प्रकारात आरोही गारगोटे यांनी प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. ]

‘दै. पुढारी’च्या वतीने आयोजित पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खेळाडूंनी सहभाग घेतला. पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 9 वर्षे, 11 वर्षे, 13 वर्षे, 15 वर्षे, 17 वर्षे अशा पाच वयोगटांमध्ये तब्बल 2250 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, अडथळा शर्यत, अशा एकूण 33 प्रकारांत स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये 9 वर्षांखालील गटाच्या स्पर्धांमध्ये 30 मीटर धावणे प्रकारात अनिष्का शहा हिने व्दितीय, तर राजेश्वरी गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकाविला. विना, खुशी जाधव आणि रिया चौधरी यांनी अनुक्रमे 4 ते 6 क्रमांक पटकाविले. 50 मीटर धावणे प्रकारात अलंकिता गुड्र हिने रौप्य, तर अनिष्का शहा हिने कांस्यपदक पटकाविले. तीर्था मोहिते, कौशिकी जाधव आणि राजेश्वरी गायकवाड यांनी अनुक्रमे 4 ते 6 क्रमांक पटकाविला.

100 मीटर धावणे प्रकारात राधिका अगरखेडकर हिने रौप्यपदक तर अलंक्रिता गुड्र हिने कांस्यपदक पटकाविले. गिरिजा डोळे, राजेश्वरी गायकवाड आणि कौशिकी जाधव यांनी अनुक्रमे 4 ते 6 क्रमांक पटकाविले. लांब उडी प्रकारात राधिका अगरखेडकर हिने रौप्य, तर पूर्वा खोमणे हिने कांस्यपदक पटकाविले. 4 ते 6 क्रमांकांच्या विजेत्यांमध्ये अनुक्रमे रमा पाठक, राजेश्वरी गायकवाड आणि विशिता घोरपडे यांचा समावेश आहे.

4 बाय 50 रिले प्रकारात रचिता आरय, अलंक्रिता गुड्र, कौशिकी जाधव आणि स्वरा मोरे यांनी प्रथम क्रमांक, विश्मिता घोरपडे, श्रुती खोमणे, जेनिशा जैन आणि विद्या गटागट यांनी व्दितीय क्रमांक तर सान्वी भावे, अवनी वर्तक, रमा पाठक आणि राजेश्वरी गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरीच, स्किन केअर पार्टनर रूपमंत्रा स्किन तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी, सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे गिफ्ट पार्टनर तन्वी हर्बल यांच्या सहकार्याने या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना विशेष गिफ्ट्स देण्यात आली. त्याचबरोबर 108 जिल्हाधिकारी डॉ. प्रियांक जावळे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

...यांचे मिळाले सहकार्य

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना, पुणे गर्ल्स असोसिएशन, पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, पुणे महानगरपालिका क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड क्रीडा शिक्षक संघटना त्याचप्रमाणे पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे को-ऑर्डिनेटर हर्षल निकम यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

11 वर्षांखालील: 50 मीटर धावणे: नेत्रा नारासिमटण (सुवर्ण), तेजल लायगुडे (रौप्य), अदिता देशमुख (कांस्य), अनुश्री खानविलकर (चौथा क्रमांक), विदिशा जाधव (पाचवा क्रमांक), अन्वी भोसले (सहावा क्रमांक). 80 मीटर धावणे: अशिका दीक्षित (सुवर्ण), माही रासकर (रौप्य), अरिनी यादव (कांस्य), तेजल लिगाडे (चौथा क्रमांक), राधा निजामपुरकर (पाचवा क्रमांक), अव्देता देशमुख (सहावा क्रमांक). 200 मीटर: तेजल लिगाडे (सुवर्ण), अंशिका दीक्षित (रौप्य), अनया पाटील (कांस्य), रक्षिता राठोड (चौथा क्रमांक), अनुधा सवधी (पाचवा क्रमांक), राधा निजामपूरकर (सहावा क्रमांक). गोळाफेक (2 किलो): अनुदी सवदी (सुवर्ण), नेत्रा नरसिम्हण (रौप्य), अनुष्का सवाई (कांस्य), भार्गवी गणेशकर (चौथा क्रमांक), हिंदवी चौधरी (पाचवा क्रमांक), शेजल कुमावत (सहावा क्रमांक). लांब उडी: राधिका राठोड (सुवर्ण), अंशिका दीक्षित (रौप्य), अनुश्री खानविलकर (कांस्य), अनया पाटील (चौथा क्रमांक), माही रासकर (पाचवा क्रमांक), आराध्या पाटील (सहावा क्रमांक). उंच उडी: अन्वी पवार (सुवर्ण), मित्तल कायरा (रौप्य), अनन्या सिंघ (कांस्य), आराध्या कौटिकर (चौथा क्रमांक), सुकन्या नाटकर (पाचवा क्रमांक), प्रचिता मात्रेवार (सहावा क्रमांक). 4 बाय 50 रिले: तेजल लिंगाडे, अनुश्री खानविलकर, सई शेलारकर, परितीनी जाधव (सुवर्ण), कीर्ती घोरपडे, माही रासकर, सिद्धी कणसे, रिया निशाद (रौप्य), अन्वी भोसले, अनया चौधरी, अनुषा आनंद, स्वरदा दांडेकर (कांस्य).

13 वर्षांखालील गट: 50 मीटर: कादंबरी शेलार (सुवर्ण), साक्षी हंडलेकर (रौप्य), गार्गी जेधे (कांस्य), दिशाली नाहर (चौथा क्रमांक), अव्दैता कोरहाळे (पाचवा क्रमांक), वैदेही जोशी (सहावा क्रमांक). 80 मीटर: कादंबरी शेलार (सुवर्ण), अनुषा फडतरे (रौप्य), साक्षी हंदळेकर (कांस्य), अधिश पवार (चौथा क्रमांक), प्रांजल थोरात (पाचवा क्रमांक), रियाबशी गावडे (सहावा क्रमांक). 200 मीटर: अनुषा फडतरे (सुवर्ण), प्रांजल थोरात (रौप्य), अधीश पवार (कांस्य), आर्या कदम (चौथा क्रमांक), रियांशी गावडे (पाचवा क्रमांक), साक्षी हंदळेकर (सहावा क्रमांक). 80 मीटर अडथळा शर्यत: आर्या कदम (सुवर्ण), दिशाली नाहर (रौप्य), मीरा पोपली (कांस्य), बतुल रेतीवाला (चौथा क्रमांक), संचिता शिंदे (पाचवा क्रमांक), आराध्या जगदाळे (सहावा क्रमांक). गोळा फेक (2 किलो): विभूती भावळे (सुवर्ण), ईश्वरी निजारे (रौप्य), यशस्वी अडागळे (कांस्य), सोनाली चव्हाण (चौथा क्रमांक), चार्वी देसाई (पाचवा क्रमांक), वैमु बासन्तेरी (सहावा क्रमांक). लांब उडी: विश लोम्बार (सुवर्ण), गार्गी जेधे (रौप्य), विद्या जाधेकर (कांस्य), तनिष्का जाधव (चौथा क्रमांक), स्पृहा पांगेर (पाचवा क्रमांक), आद्री गोस्वामी (सहावा क्रमांक). उंच उडी: वीरा लोम्हार (सुवर्ण), बतुल रेतिवाला (रौप्य), कमाईश मुलचन्दी (कांस्य), मीरा पोपली (चौथा क्रमांक), प्रचिती चव्हाण (पाचवा क्रमांक). 4 बाय 100 रिले: सराई पर्णाईक, गार्गी जेधे, वैदेही जोशी, अनुषा फडतरे (सुवर्ण), साक्षी हंडलेकर, स्पृहा पांगारे, अर्वा स्वामी, निहिरा केसकर (रौप्य), दीशाली नहार, मेहराज मुजावर, सान्वी महालंक, आर्या कदम (कांस्य).

15 वर्षांखालील: 80 मीटर धावणे : भार्गवी देशमुख, (सुवर्ण), असावी टकले (रौप्य), अनया मुखर्जी, (कांस्य), सई झारगड (चौथा क्रमांक), नसरिता विष्णू (पाचवा क्रमांक), मूमी चव्हाण (सहावा क्रमांक). 200 मीटर धावणे : भार्गवी देशमुख (सुवर्ण), आसवी टकले (रौप्य), शार्वी कुंचे (कांस्य), भूमी चव्हाण (चौथा क्रमांक), सई जारगड (पाचवा क्रमांक), अवंती जोशी (सहावा क्रमांक). 600 मीटर धावणे : सोमती कोडग (सुवर्ण), सृष्टी कराळे (रौप्य), आदिती हरगुडे (कांस्य), नेत्रा मच्छा (चौथा क्रमांक) , अनुष्का कुंभार (पाचवा क्रमांक), भाग्यश्री भोसले (सहावा क्रमांक). 1000 मीटर धावणे : सोमती कोडग (सुवर्ण), आदिती अरगुळे (रौप्य), नेत्रा मच्छा (कांस्य), सिद्धी शिंदे (चौथा क्रमांक), दर्शनी गोगावत (पाचवा क्रमांक), इशीका जैन (सहावा क्रमांक). 80 मीटर अडथळा शर्यत : मानसी चव्हाण (सुवर्ण), सानवी म्हाळंक (रौप्य), भूमी चव्हाण (कांस्य), विधी लाड (चौथा क्रमांक), अंकीता लगड (पाचवा क्रमांक), स्वरा चाबुस्वार (सहावा क्रमांक). गोळा फेक (3 किलो) : जयानी पाटील (सुवर्ण), आर्या गोखले (रौप्य), स्वरा पाटील (कांस्य), गंधाली कुलकर्णी (चौथा क्रमांक), सौम्या म्हस्के (पाचवा क्रमांक), ईश्वरी पवार (सहावा क्रमांक). लांब उडी : रावी रोकडे (सुवर्ण), राजनंदीनी मोहिते (रौप्य), केतकी कुंटे (कांस्य), वेदिका पाटील (चौथा क्रमांक), अनया मुखर्जी (पाचवा क्रमांक), इरा चंदोरकई (सहावा क्रमांक). उंच उडी : शिरीन अगरकर (सुवर्ण), विधी लाडे (रौप्य), कार्तिकी डोके (कांस्य), वदिका पाटील (चौथा क्रमांक), मानसी चव्हाण (पाचवा क्रमांक). 4 बाय 100 रिले : आर्या धमाणे, सई जारगड, भूमी चव्हाण, आस्वी टकले (सुवर्ण), भार्गवी देशमुख, अदिश्री जायभाय, मीनल दावरे, श्रावणी जाधव (रौप्य), चार्वी गायकवाड, अवंती जोशी, वेदिका पाटील, अनया मुखर्जी (कांस्य).

17 वर्षांखालील: 100 मीटर धावणे : सुचित्रा पाटील (सुवर्ण), सिया घुगळे (रौप्य), समीक्षा भालेराव (रौप्य), सेजल शिंपी (चौथा क्रमांक), तन्वी वैद्य (पाचवा क्रमांक), नैशा डारू (सहावा क्रमांक). 400 मीटर धावणे : दिव्या घोडेकर (सुवर्ण), समीक्षा भालेराव (रौप्य), सृष्टी हांडगर (कांस्य), हर्षदा पाटील (चौथा क्रमांक), प्रांजल पगारिया (पाचवा क्रमांक), प्रतीक्षा सलगर (सहावा क्रमांक). 800 मीटर धावणे : दिव्या घोडेकर (सुवर्ण), सृष्टी हांडगर (रौप्य), अदिती तांबे (कांस्य), वैष्णवी खाडे (चौथा क्रमांक), प्रतीक्षा सलगर (पाचवा क्रमांक), अवंती डिंबळे (सहावा क्रमांक). 1500 मीटर धावणे आराशिया पवार (सुवर्ण), अदिती तांबे (रौप्य), श्रध्दा निकम (कांस्य), दक्षता नहार (चौथा क्रमांक), वैष्णवी खाडे (पाचवा क्रमांक), अवंती डिंबळे (सहावा क्रमांक). 100 मीटर अडथळा: दक्षता नहार (सुवर्ण), समृध्दी भोईर (रौप्य), सेजल शिंपी (कांस्य), खुशी चौधरी (चौथा क्रमांक), वेदांती वाळुंज (पाचवा क्रमांक), अमुल्या बनगर (सहावा क्रमांक). गोळा फेक (4 किलो): मृदुल नडे (सुवर्ण), सई गिरघे (रौप्य), सिध्दी खाने (कांस्य), सिया बजाज (चौथा क्रमांक), चैत्राली साळुंखे (पाचवा क्रमांक), नैन्सी मिश्रा (सहावा क्रमांक). लांब उडी : सुचिता पाटील (सुवर्ण), दक्षता नहार (रौप्य), मिताली मराठे (कांस्य), अमूल्या बांगरे (चौथा क्रमांक), सिया घुगळे (पाचवा क्रमांक), अगम्या लाहोरी (सहावा क्रमांक). 4 बाय 100 रिले : सेजल शिंपी, समीक्षा भालेराव, वेदांती वाळुंज, दिव्या घोडेकर (सुवर्ण), दक्षता नहार, प्रांजल पगारिया, अवंती डिंबळे, सिया गुगळे (रौप्य), अगम्या लाहिटी, मनुश्री पवार, अनन्या बाबर, वेदिका मिसाळ (कांस्य).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news