

पुणे: सलग दुसर्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 210 रुपयांनी वाढून 1 लाख 6 हजार 90 रुपयांवर गेला आहे. गत पाच दिवसांत शुद्ध सोन्याच्या भावात चार हजार रुपयांनी वाढ झाली आहे. (Latest Pune News)
सराफी बाजारात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 97 हजार 250 रुपयांवर गेला आहे. चांदीच्या दरात गत पाच दिवसांत किलोमागे सहा हजार रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा एका किलोचा भाव 1 लाख 26 हजार 100 रुपयांवर गेला आहे.