Crime News : शेतातील विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणातील टोळी जेरबंद

सहा आरोपी ओतूर पोलिसांच्या जाळ्यात
pune news
चोरी प्रकरणातील टोळी जेरबंदpudhari
Published on
Updated on

ओतूर : गत काही महिन्यात ओतूर आणि आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील विहिरींच्या विद्युत मोटारला जोडलेली महागडी केबल चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्या अनुषंगाने ओतुर, रोहकडी, खामुंडी (ता. जुन्नर) परिसरातील शेतजमीन विहीरीमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी करणा-या आरोपींच्या ओतुर पोलीसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.

याबाबत ओतूर पोलीस स्टेशन हद्दितील शेतकऱ्यांचे शेतातील विहीरीमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी संदर्भात ओतुर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना ओतुर पोलीस ठाणे येथे पोस्को कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेकडे अधिक तपास करण्यात आला. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करता त्याने त्याचे साथीदारांचे मदतीने ओतुर पोलीस ठाणे हद्दित ओतुर, रोहकडी, खामुंडी परिसरातील शेतकरी यांचे शेतजमीन विहीरीमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी केल्या असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तपास करता ओतूर पोलीस ठाणे येथे विहीरीतील मोटारीचे केवल चोरीबाबत दाखल गुन्ह्यांपैकी ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. केशव बबन काळे (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), किशोर सुरेश काळे (रा. भोजदरी, संगगनेर, जि. अहमदनगर), राहुल विठ्ठल काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) व दिपक तात्याबा डोके (रा. सावरचोळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांनी केबल चोरी केल्याची कबुली दिली.

या चोरट्यांनी चोरून नेलेल्या विद्युत मोटारीचे केबली जाळुन त्यामधुन निघालेल्या धातुच्या तारा भंगार खरेदी व्यावसायीक सोबरन राजाराम चौहान (रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, मुळ रा. मध्यप्रदेश) व मेटल खरेदी व्यावसायीक विक्रमसिंग अमरसिंग राठोड (रा. आळेफाटा, मुळ रा. राजस्थान) यांना विकल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे.

त्याप्रमाणे सदर गुन्हयात चोरी करणारे ४ व चोरीचा माल विकत घेणारे २ असे एकुण ६ आरोपीनाओतूर पोलिसांनी अटक केली आहे, त्यांचेकडुन ९ हजार रू. किंमतीचे विद्युत मोटरीचे केवल जाळुन त्यातुन काढलेल्या १८ किलो वजनाच्या थातुच्या तारा, ५ हजार रुपये किंमतीच्या विद्युत मोटारीचे काळे केबल, १०० रु. किंमतीचे एक कटर, तसेच गुन्हा करताना वापरलेली बजाज पल्सर १८० मोटार सायकल (एमएच १५ ईसी ७२४८) व बजाज पल्सर १८० मोटार सायकल (एमएच १२ एसपी ६८४१) असा एकुण १ लाख १४ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला.

आरोपींनी ओतुर व जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली असून याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळशीराम भवारी, पोलीस हवालदार नदीम तडवी हे अधिक तपास करीत आहेत. आरोपींना जुन्नर येथील प्रथमवर्ग व्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. आरोपीपैकी केशव बचन काळे व किशोर सुरेश काळे हे दोन सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचेवर जुन्नर, नारायणगाव, ओतुर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाणे येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदिप आमणे, पोलीस हवालदार महेश पटारे, बाळशीराम भवारी, नामदेव बांबळे , नदीम तडवी, पोलिस जवान विशाल गोडसे, सुभाष केदारी,शामसुंदर जायभाये, होमगार्ड ईश्वर भवारी, पोलीस पाटील किरण भोर, पोलीस मित्र विठ्ठल डोंगरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news