Ganpati Festival: देशात यंदा गणेशोत्सवात 45 हजार कोटींची उलाढाल, महाराष्ट्राचा वाटा किती टक्के?

महाराष्ट्राचा वाटा 60 टक्के; कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज
Ganeshotsav Celebration : ganeshotsav 45 thousand crore turnover this year
Ganeshotsav Celebration : यंदा गणेशोत्सवात 45 हजार कोटींची उलाढालFile Photo
Published on
Updated on

पुणे : बाप्पांच्या आगमनामुळे महाराष्ट्रासह देशातील नागरिकांचा हॅपीनेस इंडेक्स टिपेला असून भरपूर पावसामुळे खरेदीचा उत्साह वाढला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात देशात तब्बल 45 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 60 टक्के असेल, असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवला आहे. महाराष्ट्रामुळे संपूर्ण देशातील व्यापाराला बूस्ट मिळाला आहे.

यंदा मे महिन्यापासूनच देशभरात चांगल्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाल्याने खरेदीला उधाण आले आहे. यात कपडे, सराफा, रिअल इस्टेट आणि वाहन बाजारसह गणेशोत्सवात इव्हेंट कंपन्यांची मोठी उलाढाल सुरू आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने गणेशोत्सव 2025 चा क्षेत्रनिहाय अहवाल अद्याप दिला नसला तरी अंदाज वर्तवला आहे. या गणेशोत्सवासाठी लक्षणीय आर्थिक वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

गणेशोत्सव 2025 साठी क्षेत्रनिहाय अंदाज...

एकूण व्यवसाय : 45 हजार कोटी

कार्यक्रम व्यवस्थापन : 5 हजार कोटी

उत्सवाशी संबंधित व्यापार : 3 हजार

खाद्यपदार्थ : 3 हजार कोटी

मिठाई (मोदकसह) : 2 हजार कोटी

गणेशमूर्ती : 500 कोटी

मंडप खर्च : 10 हजार कोटी (महाराष्ट्रात)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news