CDS Anil Chauhan: 'भविष्यातील युध्द एआय तंत्रज्ञानाने होतील, युध्दभूमीवरचा माणसाचा वावर कमी होणार'

CDS Anil Chauhan on Operation Sindoor: एक डाव राखून मॅच जिंकावी तशी धूळ आपण पाकिस्तानला चारली
Pune News
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहानPudhari
Published on
Updated on
  • ऑपरेशन सिंदुरने इतिहास निर्माण केला

  • किती नुकसान झाले यापेक्षा युद्ध जिंकले हे महत्वाचे

  • पाकिस्तानचा युध्द थांबविण्याबाबत फोन आल्यावरच ते थांबवले

  • भविष्यातील युध्द एआय तंत्रज्ञानाने होतील

  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची माहिती

पुणेः एक डाव राखून जसा क्रिकेट मध्ये सामना जिंकला जातो. तशाच पध्दतीने आपण ऑपरेशन सिंदुरद्वारे युध्दात पाकिस्तानला धूळ चारली. या युध्दाने इतिहास निर्माण केला.यात किती नुकसान यापेक्षा युध्द आपण जिंकले हे महत्वाचे आहे. पाकिस्ताने शेवटी फोन करुन युध्द थांबविण्याची विनंती केली, त्यानंतरच युध्द थांबवले मात्र ऑपेऱशन सिंदुर पूर्ण थांबलेले नाही अशी माहिती देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी येथे एका व्याख्यानात दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सामरीक शास्त्र विभागाच्या वतीने जन.चौहान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु पराग काळकर, कलचिव डॉ.चारुशीला गायके,सामरिक शास्त्रविभागाचे प्रमुखे प्रा.डॉ. विजय खरे यांची व्यापीठावर प्रमुख उपस्थिती होती.तसेच यावेळी विद्यार्थांसह सैन्यदालाच्या लष्कर,नौदल आणि हवाईदलातील अधिकारी यांनी गर्दी करुन हे व्याख्यान ऐकले.जन चौहान असे पर्यत विद्यापीठाला जणू सैन्यदलाच्या छावणीचे स्वरुप आले होते इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी होता.

दहशतवादी हल्यांत आजवर 20 हजार भारतीयांचा मृत्यू..

सध्याचे आणि भविष्यातील युध्द या विषयावर जन. चौहान यांच्या व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदुर आपण कसे लढलो,जिंकलो आणि पाकिस्तानसह शस्त्रू राष्ट्रांना कसा धडा शिकवला त्यासह भविष्यातील युध्द यापुढे कशी होऊ शकतील याचा अंदाजही दिला.ते म्हणाले, ऑपरेशन सिंदुर म्हणजे पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला त्याचे प्रत्युत्त्तर होते.आजवर पाकिस्तानने असेच भ्याड दहशतवादी हल्ले आपल्यावर केले.या हल्ल्यांत आपण आजवर 20 हजार लोक गमावले आहेत.

क्रिकेट अन फुटबॉल मॅचचे उदाहरण दिले...

या वेळी फक्त दोनच विद्यार्थांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली होती.या युध्दात आपले किती नुकसान झाले.तसेच आपण पाकिस्तानला धडा इतक्या कमी कालावधीत कसा शिकवला... असे ते दोन प्रश्न होते.त्यावर जन.चौहान यांनी फुटबॉल आणि क्रिकेट सामन्यांचे उदाहरण दिले.ते म्हणाले,आपण फुटबॉल मॅच मध्ये बघतो तीन- दोन किंवा दोन- तीन ने सामना कुणी जिंकते किंवा हरते.तसेच इथे झाले नाही.क्रिकेट टेस्ट मॅच मध्ये जेव्हा अख्या एका डावाने मॅच जेव्हा जिंकतो,तेव्हा सामना किती धावांनी,किती गडी राखून जिंकलो या गोष्टी गौण ठरता.डावाने जिंकलो म्हणजे मोठा विजय असतो.तसेच ऑपरेश सिंदूर आपण जिंकलो आहे.

आपले नुकसान किती,याची माहिती देणार..

आपले या युध्दात नुकसान किती झाले.या प्रश्नावर स्मीत हास्य करीत ते म्हणाले.युध्द जिंकतो तेव्हा किती नुकसान झाले याचाही विचार करायचा नसतो.विजय शेवटी विजय असतो.तरीपण ही माहिती लवकरच देऊ अशी ग्वाही त्यांनी सर्वांना दिली.

सीडीएस जन.चौहन आणखी काय म्हणाले...

  • या पुढची युध्द माणसांत नव्हे तर यंत्र विरुध्द यंत्र अशी होतील,यापुढे युध्दभूमिवरचा माणसाचा वावर कमी होईल.

  • रोबोटीक,एआय,सेंसर,अणू,कॉस्मिक, सिस्मिक अशा अनेक तंत्रज्ञानाचा वापर युध्दात होईल.

  • आपण पाकिस्तानचे मोठे नुकसान केले आह.े याची माहिती आपण सॅटेलाईट इमेजसह अनेक प्रकारचे तंत्रज्ञान वापरुन मिळवली. तसेच त्यांच्या ट्वीटर वरील माहितीची खातर जमा केली.

  • पाकिस्तानने युध्द थांबवा असा फोन केल्यावरच युध्द थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र अजून ऑपरेशन सिंदुर संपलेले नाही.

  • पाकिस्तानची खुमखुमी अनेक पिढ्यांपासून सुरु आहे.माजी अध्यक्ष जुल्फिकारअली भुट्टोपासून ती ते ऑपरेशन सिंदूर असा प्रवास आहे.भारताशी हजार वर्षे युध्द करीत राहू अशी भुत्तो यांनी म्हटले होते.मात्र ही खूमखुमी आपण वारंवार जिरवली आहे. ऑपेऱन सिंदुरने खूप मोठा हादरा त्यांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news