

पुणे: पीएमपी प्रशासनाकडून महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिलादिनी म्हणजेच शनिवारी (दि. 8) दिवसभर महिलांना महिला विशेष बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
पीएमपी अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक आणि पीएमपीतील चालक-वाहक व अन्य कर्मचार्यांकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यामुळे महिलावर्गाला महिलादिनी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
मेट्रोकडूनही एक पुणे कार्ड मिळणार
जागतिक महिला दिनानिमित्त मेट्रोकडून हे कार्ड फक्त महिलांसाठी अवघ्या 20 रुपयांना मिळणार आहे. मेट्रोकडून जागतिक महिला दिनानिमित्त ही भेट महिलांना देण्यात आली आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन मेट्रोकडून करण्यात आले आहे.