राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. एप्रिल ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील 70 हजार शाळांमधील 98 लाख मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2164 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.
आरबीएसके अंतर्गत मुलांमध्ये जन्मत: असलेले व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व इतर अपंगत्व इत्यादींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास 2 कोटी मुलांना कार्यक्रमाचा लाभ होत आहे. अंगणवाडी स्तरावर 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून दोनदा होणारी आरोग्य तपासणी हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा घटक आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण 1196 पथके मंजूर करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 1 वाहन, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 औषधी निर्माण अधिकारी, 1 परिचारिका यांची नियुक्ती केली आहे. याअंतर्गत 104 प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. यापैकी 52 शस्त्रक्रियांचा समावेश महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये होतो. उर्वरित 52 शस्त्रक्रियांमध्ये 31 प्रकारच्या दातांच्या विकारांचा समावेश होतो.
एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये एकूण 1 लाख 10 हजार 171 अंगणवाड्यांची आणि 67 लाख 61 हजार 776 बालकांची तपासणी पूर्ण केली.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत 51 हजार 045 अंगणवाड्यांची आणि 30 लाख 46 हजार 064 बालकांची तपासणी पूर्ण करण्यात आली.
एकूण 22 हजार 276 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आकडेवारी द़ृष्टिक्षेपात