

Maval News : मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावाचे माजी उपसरपंच हनुमंत बबुशा कोयते (वय ४४) यांचे मंगळवारी(दि.०६) सकाळी मधमाशांच्या हल्ल्यात निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोयते हे मित्रांसमवेत नेहमी प्रमाणे सकाळी डोंगरावर चालण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच त्यांचे निधन झाले
हनुमंत कोयते यांनी उपसरपंचपदाच्या काळात गावाच्या विकासासाठी अनेक उपाययोजना राबवल्या होत्या. त्याच्या मृत्यूमुळे नवलाख उंबरे गावात शोककळा पसरली आहे.