

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. उमेदवार अधिकृत साइट upsc. gov. in या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल तपासू शकतात. या परीक्षेत यशस्वी होणार्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी पुढील टप्प्यात उपस्थित राहावे लागेल.
यशस्वी उमेदवारांना तपशीलवार अर्ज फॉर्म 2 भरावा लागेल. 20 जानेवारी ते 27 जानेवारी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर संबंधित अर्ज उपलब्ध असेल. ऑनलाइन फॉर्ममध्ये उमेदवारांना झोन किंवा केडरसाठी त्यांची पसंती सादर करावी लागेल आणि उच्च शिक्षण, विविध क्षेत्रांतील कामगिरी, सेवा अनुभव, ओबीसी प्रमाणपत्र आणि आवश्यकतेनुसार ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, यासाठी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
आयोगाच्या नियमांनुसार दिलेल्या तारखेनंतर अर्ज किंवा त्याच्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास कोणताही विलंब झाल्यास संबंधित उमेदवार निवड रद्द होण्यास पात्र ठरेल. उमेदवार उच्च शिक्षण, विविध क्षेत्रांतील कामगिरी, सेवा अनुभव इत्यादींशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे/प्रमाणपत्रे देखील अपलोड करू शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
सर्वप्रथम उमेदवारांनी ‘यूपीएससी’च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर उमेदवारांनी ‘व्हॉट इज न्यू’ विभागात जाऊन यूपीएससी-आयएफएस मुख्य निकाल 2024 ची लिंक पाहावी. लिंकवर क्लिक केल्यानंतर व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी निवडलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची यादी असलेली एक पीडीएफ फाइल उघडेल. उमेदवारांनी ही पीडीएफ डाऊनलोड करावी. त्यानंतर उमेदवारांना त्याची प्रिंटआउट घेता येणार आहे.