सोरतापवाडी येथे गॅरेजमध्ये ट्रक घुसल्याने पाच वाहनांचा चक्काचूर

नशेत वाहन चालवणार्‍या ट्रकचालकावर गुन्हा दाखल
Uruli Kanchan News
सोरतापवाडी येथे गॅरेजमध्ये ट्रक घुसल्याने पाच वाहनांचा चक्काचूरPudhari
Published on
Updated on

उरुळी कांचन: दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने ट्रक थेट महामार्गालगतच्या मोटर गॅरेजमध्ये घुसला. ट्रकने गॅरेजमधील तीन मोटारींचा तसेच दोन दुचाकींचा चुराडा केला. ही घटना रविवारी (दि.30) दुपारी अडीचच्या सुमारास सोरतापवाडी (ता.हवेली) येथील हद्दीत घडला आहे. सुदैवाने या वेळी गॅरेजमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली.

याप्रकरणी अशोक सुंकडे (वय 27, ढाळेवस्ती, ता. पाटोदा, जि. बीड) या ट्रकचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गॅरेज मालक विनीत कुमार अमरपाल सिंग (वय 26, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचालकाने दारूच्या नशेत सोरतापवाडी हद्दीतील गॅरेजमध्ये घुसला. गॅरेजमधील मोटारींचा तर एका दुचाकीचा या अपघातात चक्काचूर झाला. याप्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news