

पुणे: पुण्यातील मंगळावर पेठेत रविवारी (दि.२५) पहाटेच्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. दुचाकीवरून ये-जा करत असताना हटकल्याच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणी यामध्ये जखमी झालेले नाही.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी रोहीत माने (वय 32 रा. लोहियानगर) आणि त्याचा साथीदार कासीम अन्सारी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, किरण केदारी,शाम गायकवाड,अश्पाक शेख, संतोष कांबळे, हे चौघेजण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून ये जा करत होते. त्यांना हटकले. त्याचा राग आरोपींना आला त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र सुदैवाने कोणाला गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा आरोपींना अटक केली.