पुण्यातील लोणी काळभोर येथे महिलांच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारीPudhari News Network
पुणे: लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत घडली आहे. या हाणामारीत एक महिला व पुरुष असे दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवकर, विलास शिंदे, शैलेश कुदळे, राहुल कर्डिले, शिल्पा हरिहर, मीना वाघाडे, कोमल आखाडे, दीपाली पाडूळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती हाताळून दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील कारवाई लोणी काळभोर पोलिस करीत आहेत

