निमगाव केतकीत दोन गटांत मारामारी; एकूण 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हे

पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.
Indapur News
निमगाव केतकीत दोन गटांत मारामारी; एकूण 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हे File Photo
Published on
Updated on

इंदापूर: तालुक्यातील निमगाव केतकी दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटातील एकूण 11 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये शंकर भोंग (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (दि.14) सकाळी साडेदहाच्या सुमारास निमगाव केतकी हद्दीत इंदापूर रस्त्यावर जय कुदळे, दिनेश शेंडे,दादा भोंग, सुरज पिसे, ओमकार राउत यांच्या कारने आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ वादातून फिर्यादीची बुलेट अडवली. त्यानंतर आरोपींनी हाताने व लाथा-बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली.

या वेळी जय कुदळे याने धारदार चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करून बोट नखाजवळून कट होऊन फॅक्चर झाले. त्याच वेळी दिनेश शेंडे याने फिर्यादीच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चेन काढून घेतली व ’पुन्हा आमच्या नादाला लागला तर तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकी देऊन पसार झाले. यावरून जय कुदळे, दिनेश शेंडे, दादा भोंग, सुरज पिसे व ओमकार राउत (सर्व रा.निमगाव केतकी) यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दादासो मधुकर भोंग (वय 27) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.14) सकाळी साडेदहाच्या सुमारास निमगाव केतकी येथील डोंगरे कॉम्प्लेक्ससमोर शंकर भोंग, स्वप्निल भोंग, शक्ती बारवकर, स्वप्निल बारवकर, अमोल भोंग, आशितोष भोंग यांनी रात्री झालेल्या भांडणावरून फिर्यादीसह त्यांचे मित्र जय कुदळे व दिनेश शेंडे यांना हाताने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच शंकर भोंग याने चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताचे अंगठ्याजवळील बोटावर मारहाण करून दुखापत करीत डाव्या हाताच्या बोटातील 1 तोळ्याची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. तसेच दिनेश शेंडे यांना चाकू मारून किरकोळ दुखापत केली. यावरून शंकर भोंग, स्वप्निल भोंग, शक्ती बारवकर, स्वप्निल बारवकर, अमोल भोंग, आशुतोष भोंग (सर्व रा.निमगाव केतकी) यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news