

नानगाव : नानगाव (ता. दौंड) येथील शेतकरी राजेंद्र बापूराव खळदकर (वय अंदाजे ५३) व पत्नी मनिषा राजेंद्र खळदकर (वय अंदाजे ४८) यांचे आज दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे गावात ऐन दिवाळीत दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुपारी दोघे पती- पत्नी शेळ्या चारण्यासाठी व गवत कापण्यासाठी भीमा नदीच्या काठाजवळ गेले होते. या भागात मोठ्या प्रमाणावर विद्युत मोटारी असल्याने विजेच्या तारा, वायर आहेत. बराच वेळ झाला तरी देखील दोघे पती पत्नी घरी आले नसल्याने घरातील मंडळी पहाण्यासाठी गेले.
या सुमारास आज पाऊस आणि वारे देखील वाहत होते. घरातील काही व्यक्ती गेल्यावर त्यांना दोघा पती पत्नीला विजेचा धक्का बसला असा त्यांना अंदाज आल्याने लगेच खाजगी दवाखान्यात दाखल केले; मात्र या विजेच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू झाला असे समजल्यावर गावात शोककळा पसरली.