

दौंड : दौंड न्यायालयाच्या आवारात लोखंडे वस्तीवरील मोहन दशरथ विरकर (वय 45, रा. लोखंडे वस्ती दौंड) यांनी कौटुंबिक वादातून न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना सर्व गुरुवारी (दि. १७) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. नागरिक व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली. दौंड पोलिसांनी मोहन वीरकर याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीकरता दवाखान्यात पाठवले आहे. आता पोलीस काय गुन्हा दाखल करतात हे पाहणे गरजेचे आहे.