एक आदर्श असाही ! वृक्षलागवड करीत आईच्या अस्थी विसर्जित

एक आदर्श असाही ! वृक्षलागवड करीत आईच्या अस्थी विसर्जित

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : मृत आईच्या सहवासाचा गंध कुटुंबाला रहावा म्हणून अस्थी नदी किंवा तलावात विसर्जित करण्याऐवजी आपल्या निवासस्थानी वृक्षारोपण तसेच शोभेच्या फुल-झाडांना अर्पण करण्यात आल्या. सोरतापवाडी (ता. हवेली) येथील चौधरी परिवाराने हा निर्णय घेतला आहे. समाजात रितीरिवाजाप्रमाणे मृत मानवाच्या अस्थी पवित्र नदी किंवा तलावात विसर्जित करण्याची प्रथा आहे. यामुळे नदीप्रदूषण व नागरिकांच्या आरोग्य समस्यांच्या निर्माण होतात.

या अस्थी विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका गृहीत धरता समाजात देखील अस्थी विसर्जन पवित्र ठिकाणी विसर्जित न करण्याबाबत सजकता वाढली आहे. त्याच अनुषंगाने सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नेते रामदास चौधरी यांच्या कुटुंबीयाने स्वतःच्या आईच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी निवासस्थानी वृक्षांची लागवड करून व शोभेच्या झाडांना अर्पण करून आईचा सहवास लाभण्याचा प्रयत्न केला. या संकल्पनेचे कौतुक शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी करून प्रत्येकाने हा आदर्श जोपासला पाहिजे, असे आवाहन केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news