सरकारी फलकांवर अतिक्रमण; अनधिकृत जाहिरातींकडे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष

प्रशासन आता तरी अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करणार का?
Yerwada News
सरकारी फलकांवर अतिक्रमण; अनधिकृत जाहिरातींकडे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्षPudhari
Published on
Updated on

येरवडा: अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे फलक नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र, यातील काही फलकांवरच अतिक्रमण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे प्रशासन आता तरी अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, स्टिकर लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशा आशयाचे 35 फलक क्षेत्रीय कार्यालयाने परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. परंतु प्रशासनाकडून अनधिकृत फलकांवर ठोस कारवाई केली नाही. यामुळे परिसरात अनधिकृत जाहिरातींचे पेव फुटले आहे.

एवढेच नव्हे, तर अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांवर करण्यात येणार्‍या कारवाईबाबत क्षेत्रीय कार्यालयाने लावलेल्या काही फलकांवर अनधिकृत जाहिरातींचे अतिक्रमण झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, अनधिकृत फलकांवर कोणाचेही नावे नसल्याने कारवाई करता येत नाही. तसेच कारवाई केली तर ते फलक आम्ही लावले नाही, असे संबंधितांकडून सांगण्यात येते. मात्र, अनधिकृत फ्लेक्स लावून परिसराचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार आहे.

अनधिकृत जाहिरात फलकांमुळे परिसराचे होणारे विद्रूपीकरण रोखण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. याबाबत लवकरच पक्क्या स्वरूपाचे फलक लावण्यात येतील. तसेच, लवकरच अनधिकृत जाहिरात फलकांवर कडक कारवाई केली जाईल.

-विनोद लांडगे, अधिकारी, आकाशचिन्ह व परवाना विभाग, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news