

कात्रज: धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कात्रज चौकात अतिक्रमणांचा 'बाजार' भरला आहे. मुख्य रस्ता आणि पदपथांवर हातगाडी, पथारी व्यावसायिकांनी कब्जा केला असून नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे दररोज अपघातांचा धोका वाढला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाही, स्थानिक अतिक्रमण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामागे कोणी राजकीय वरदहस्त आहे का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. (Latest Pune News)
कात्रज चौकात अंबिका हॉटेल ते किनारा हॉटेल, तसेच जेएसपीएम कॉर्नर ते भाजी मंडईपर्यंत दोन्ही बाजूंनी रस्त्यावर आणि पदपथावर मोठ्या प्रमाणात फळ, भाजीपाला, कपडे, सरावाद्यपदार्थ विक्रेत्यांची अतिक्रमणे दिसतात. परिणामी, रस्ता अरुंद झाला असून, वाहतूक कोंडीने सर्वांचा जीव त्रस्त झाला आहे. पादचान्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागते आणि त्यामुळे लहान-मोठे अपघात बढ़त आहेत.
भारती विद्यापीठ, दत्तनगर जांभूळवाडी रस्ता, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हा भागदेखील अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला असल्याचे विदारक चित्र दिसून येत अहे. हातगाडी, पधारी व्यावस्रायिकांना महापालिका प्रशासनाच्या कारवाईचा पाकच राहिला नाही का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी ठोस पाऊल उचलत स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही चरकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग मात्र डोळेझाक करत आहे. 'फिक्स पॉइंट' फक्त कागदावरच राहिले असून, प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
आयुक्तांनी फात्रज चौकातील समस्यांची पाहणी करावी, अशी मागणी होत असून, याचाबत त्यांना निवेदनही देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. फिक्स पॉइंट केवळ नामधारी न ठेवता ठोस व सततची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग बड़क कारवाई करणार का, हे पाहाचे लागणार आहे.
या उपाययोजना आवश्यक
नियमित फिक्स पॉइंट कारवाईद्वारे अतिक्रमणमुक्ती मोहीम राबवावी,
कात्रज चौकासाठी स्वतंत्र पथक नेमून नियंत्रण ठेवावे.
अतिक्रमणाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
हातगाडी व पधारी विक्रेत्यांसाठी निश्चित स्थळी छोटचा बाजारपेठा निम्र्माण कराव्यात.
वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर दंड व माल जप्तीची सक्त अंमलबजावणी करावी.
कात्रज चौकातील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. 'फिक्स पॉइंट' असूनही कारवाई होत नाही. सामान्य नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने परिसरातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी.
अमित जांभळे, नागरिक
कात्रज चौकात 'फिक्स पॉइंट' लावण्यात आला आहे. रविवारी (दि. २६) इतर ठिकाणी कारवाईसाठी कर्मचारी पाठवले होते, त्यामुळे त्या वेळी अतिव्रक्रामणे झाली. मात्र, तत्काळ कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त केला जाईल.
सागर विभुते, वरिष्ठ अतिक्रमण निरीक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय