शंभर दिवसांत बारामतीसाठी अकराशे कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामती दौर्‍यावर होते
Ajit Pawar
शंभर दिवसांत बारामतीसाठी अकराशे कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती अजित पवारFile Photo
Published on
Updated on

बारामती: बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या जेवढ्या योजना केल्या आहेत, त्या सर्व मिळून दीड हजार कोटींच्या असतील. एका आमदाराला वर्षाला मिळतात 5 कोटी, 5 वर्षाला मिळतात 25 कोटी, तुमच्यासाठी आणलेत, दीड हजार कोटी.

100 दिवसांच्या आत जानाई शिरसाईसाठी 460 कोटी, पशुसंवर्धन विद्यालयासाठी 560 कोटी रुपये असे जवळपास अकराशे कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामती दौर्‍यावर होते. तालुक्यातील बोरकरवाडी येथे टीसीएस फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उजवा कालवा रायझिंग ते बोरकरवाडी तलावपर्यंत करण्यात आलेल्या पाईपलाईनचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले, त्या वेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, सरकारने लाडक्या बहिणीकडे जास्त लक्ष दिले आहे. यावर आमच्यावर टीका झाली. विरोधकांकडून सांगण्यात आलं की, निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल. आम्ही ही योजना बंद करणार नाही. शेतकर्‍यांसाठी असणारी वीज चालू ठेवली आहे, याचाही लाभ सर्वांनी घ्यावा.

वीस लाख घरे मंजूर

गरीब वर्गासाठी घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच पुणे विभागात 30 हजार घरांचा कार्यक्रम घेतला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ते 3 कोटी घरांचा कार्यक्रम घेतला आहे. महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर झाली आहेत. पैकी 5 हजार घरे बारामतीसाठी मंजूर झाली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news