Sexual assault case: वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; इंदापूर तालुक्यातील संतापजनक घटना

पोस्को अंतर्गत गुन्हा, आरोपीस अटक
minor girl assault
minor girl assaultfile photo
Published on
Updated on

शेळगाव : इंदापूर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलीवर एका ७९ वर्षीय वृद्धाने अत्याचार केला. संबंधित आरोपी वृद्धाला पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या घटनेने इंदापूर तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईने शनिवारी (दि. २८) वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यास दि. २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे.

या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवारी (दि. २७) शाळेतून घरी आली त्यावेळी नाराज असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलीने, तिला मासिक पाळी आली नसून तिच्यासोबत २५ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत सांगितले.

त्या दिवशी पीडित मुलगी घरी असताना आरोपी वृद्धाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याबाबत कुणाला सांगू नको, असे देखील धमकावले होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने त्या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिली नाही. तसेच मागील वर्षी आरोपीने तिला एकटी असताना मिठी मारली होती. त्याबाबत तिने आजीला माहिती दिली होती. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विजय टेळकीकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news