‘एसटी’वर आधारित अर्थकारण ठप्प

‘एसटी’वर आधारित अर्थकारण ठप्प
Vallabhnagar ST Stand
‘एसटी’वर आधारित अर्थकारण ठप्पVallabhnagar ST Stand
Published on
Updated on

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : एसटी कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या संपामुळे एसटीवर आधारित अर्थकारण ठप्प झाले आहे. पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगारात पाण्याच्या बाटल्या, चिक्की, वडापाव विकून आपली गुजराण करणार्‍या गोरगरिबांची रोजीरोटी हिरावली गेली आहे.एस.टी. चे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.

निलंबनाची कारवाई सुरू असल्याने एसटी कर्मचारी अडचणीत आले आहेतच; मात्र त्याबरोबरच एसटी वर आधारित अर्थकारण अवलंबून असलेल्या छोट्या विक्रेत्यांची अतिशय परवड झाली आहे. पिंपरीत वल्लभनगर येथे एसटी आगार आहे.

या ठिकाणाहून दादर, चेंबूर, मुंबई ,परळ, बोईसर, तारापूर, शहापूर, जव्हार, भिवंडी, वसई ,मुलुंड ठाणे, बोरिवली, पालघर, मुरुड, महाड, उरण, अलिबाग,रोहा, पेन, बेंगलोर, कारवार, बेळगाव ,सौंदत्ती हुबळी, पणजी, गगनबावडा ,मिरज, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, विटा, तासगाव, इचलकरंजी, कवठे महांकाळ,कोल्हापूर, सांगली,कराड, श्रीवर्धन, कुडाळ ,वेंगुर्ले, मालवण, महाबळेश्वर, वाई, पाचगणी, चिपळूण, कणकवली ,सातारा, रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी,गोंदवले सांगोला, मसवड, कुर्डूवाडी, जेजुरी, पंढरपूर ,बारामती, मंगळवेढा, निलंगा, हैदराबाद सोलापूर उमरगा , लातूर, तुळजापूर, इंदापूर दौंड, उस्मानाबाद,भूम परांडा, अहमदनगर, अक्कलकोट, औरंगाबाद आदी ठिकाणी एसटी बसेस धावतात.

बसेस फलाटावर लागतात तेव्हा पाण्याची बाटली, वडापाव, चिक्की विकणार्‍या छोट्या विक्रेत्यांची एकच लगबग चालते .त्यावरच त्यांची कशीबशी गुजराण होते कोरोनामुळे लादण्यात आलेल्या विविध निर्बंधातून बाहेर पडून संसार सावरू पाहत असलेल्या हातावर पोट असलेल्या या छोट्या विक्रेत्यांना आता एसटी बंद असल्याने जगावे कसे? असा प्रश्न पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news