पुणे : गुरुवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारावरील घसरण कायम राहिली. गेल्या सलग तीन सत्रांमध्ये दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मोठी घसरण होत आहे. बाजारात सकाळपासूनच हेलकावे पूर्ण वातावरण होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीची बाजाराला भीती आहे. त्यातूनच ही घसरण होत आहे. या सत्रामध्ये सेन्सेक्समध्ये 304.18 यांची अंशांची तर निफ्टीमध्ये 50.80 अंशांची घसरण झाली. या सत्रात सेन्सेक्स 60,847.50 अंश पातळीवर खुला झाला.
त्याने 60,877.06 अंशांची उच्चांकी व 60,049.84 अंशांची नीचांकी पातळी नोंदवली. कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 304.18 अंशांची घसरण होऊन तो अखेरीस 60,353.27 अंश पातळीवर बंद झाला. तसेच निफ्टी 18,101.95 अंश पातळीवर खुला झाला. त्याने 18,120.30 अंशांची उच्चांकी तर 17,892.60 अंशांची नीचांकी पातळी नोंदवली. कालच्या तुलनेत त्यात 50.80 अंशांची घसरण होऊन तो अखेरीस 17,992.15 अंशांवर बंद झाला. एनटीपीसी, आयटीसी व मारुती या कंपन्यांमध्ये आज भाववाढ झाली. बजाज फायनान्स, टायटन व रिलायन्स या कंपन्यांमध्ये घसरण झाली. सर्वाधिक उलाढाल बजाज फायनान्स या कंपनीमध्ये झाली. त्या खालोखाल रिलायन्स व इन्फोसिस यांमध्ये उलाढाल झाली.