Accident News: वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या गाडीला मुंढव्यात धडक

पोलिस कर्मचारी चालले असताना समोरून भरधाव वेगातील मद्यधुंद कारचालकाने जोरदार धडक दिली
Pune News
Accident NewsPudhari
Published on
Updated on
  • दोन पोलिस जखमी

  • चालकाच्या डोक्याला मुका मार, तर शेजारी बसलेल्या पोलिसाच्या ओठाला जखम

  • मद्यधुंद दोघे पोलिसांच्या ताब्यात

  • कारचालकावर गुन्हा

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीनिमित्त येणार्‍या नागरिकांमुळे मुंढवा परिसरात होत असलेली वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिस आयुक्त व त्यांच्यासोबत दोन पोलिस कर्मचारी चालले असताना समोरून भरधाव वेगातील मद्यधुंद कारचालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये वाहतूक पोलिस उपायुक्त हिमंत जाधव यांना सुदैवाने इजा झाली नाही. या प्रकरणी धडक देणार्‍या चालकासह दोघांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Pune Latest News)

या प्रकरणी समदिप मनमोहन सिंग (30, रा. शुभ इवान, मिडोरी वाईन्स जवळ, केशवनगर, मुंढवा मुळ रा. हरियाणा) याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिस नाईक शरद अर्जुन पवार (38, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, पुणे) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रादार शरद पवार ह पोलिस मुख्यालयात 2022 पासून नेमणुकीस आहे. सध्या ते वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे शासकीय वाहनावर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे.

Pune News
Dahihandi Celebration: दहीहंडी फोडण्याचा थरार बघण्यासाठी शहरातील विविध भागांत गर्दी

दि. 15 ऑगस्ट रोजी पवार हे कामावर आले असताना सोबत चालक पोलिस हवालदार तानाजी कोंढाळकर हे देखील होते. कोंढाळकर हे गाडी चालवत असताना पवार त्यांच्या शेजारी सीटवर बसले होते, तर पोलिस उपायुक्त हिंमत जाधव गाडीच्या मागील सिटवर बसलेले होेते. मुंढवा येथील कुंभारवाडा येथे गणेशमूर्ती विकत घेण्याकरिता नागरिकांची व वाहनांची गर्दी होत असल्याने केशवनगर कुंभारवाडा या भागाची पाहणी करण्याकरता आले होते. पाहणी करून झाल्यावर सव्वा दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडा येथून मुंढवा चौकाकडे परत जात असताना रोडला नागरिकांची गदी होती.

त्यामुळे कोंढाळकर हे कार हळू चालवत होते. पोलिस उपायुक्त बसलेली गाडी मुंढव्यातील केशवलीला अपार्टमेंट येथे आली असताना मुंढवा चौकाकडून केशवनगरकडे जाणार्‍या भरधाव कारने पोलिस उपायुक्तांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात पोलिस नाईक पवार यांच्या ओठाला व दाताला दुखापत झाली. तर चालक कोंढाळकर यांचे डोके दरवाजावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला मुक्का मार लागला. या अपघातानंतर पोलिस उपायुक्त व पवार यांनी गाडीतून उतरून पाहिले असता उजव्या बाजूने गाडीची पूर्ण बॉडी डॅमेज होऊन चाक मागील बाजुला सरकले होते.

Pune News
Engineering Admissions: अभियांत्रिकीसाठी 64 हजारांवर प्रवेश

धडक देणार्‍या गाडीची पाहणी केली असता, ती कार समदिप सिंग चालवत असल्याचे समजले. त्याच्या सोबत मनीषकुमार सुमानकुमार सिंग (28, रा. शुभ शगुन सोसायटी, जुना मुंढवा रोड, खराडी) असल्याचे समजले. पोलिस उपायुक्तांनी लागलीच स्थानिक मुंढवा पोलिसांना बोलावून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांना पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news