पुणे : शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) 2025 परीक्षेचे यंदाचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून जाहीर केले आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 24 ते 27 सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांनी दिली आहे.
दांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या. परंतु, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, अधिनियम 2023 दि. 23 फेब—ुवारी 2024 पासून लागू केला आहे. त्यामुळे यापुढे परीक्षा मंडळाकडूनच परीक्षा घेण्यात येणार आहे.
संबंधित सर्व केंद्रप्रमुखांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची नावनोंदणी करताना दोन्हीपैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाइन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाइन पद्धतीने https:/// www.msbae.org.in या संकेतस्थळावर भरायची असल्यामुळे संबंधित परीक्षांना प्रविष्ट होऊ इच्छिणार्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रप्रमुखांनी निदर्शनास आणावे, असेदेखील स्पष्ट केले आहे.
केंद्रांची नोंदणी / केंद्राची माहिती अद्ययावत करणे ऑनलाइन पद्धतीने - 21 ते 26 जुलै
केंद्राच्या अधिनस्त असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने- 21 ते 26 जुलै
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करणे - 21 जुलै ते 24 ऑगस्ट
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक - 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करणे - (विलंब शुल्कासह) - 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रवीष्ट होणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन
पद्धतीने करणे - (अतिविलंब शुल्कासह) -1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर
परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करणे
- 21 जुलै ते 31 ऑगस्ट