Gokhale Institute | डॉ. अजित रानडे यांना कुलगुरु पदावरून हटविले

गोखले इन्स्टिट्यूटचे नवनियुक्त कुलपती बिबेक देबरॉय यांनी दिले कारवाईचे पत्र
Gokhale Institute
Gokhale InstituteFile Photo
Published on
Updated on

पुणे : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स या जगप्रसिद्ध स्वायत्त विद्यापाठीचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना १४ सप्टेंबर रोजी कुलगुरुपदावरून हटविण्यात आले आहे. संस्थेने नेमलेल्या सत्यशोध समितीने दिलेल्या निकालानंतर ही कारवाई झाली आहे.

डॉ. रानडे यांना कुलगुरुपदावरून मुक्त केल्याचे पत्र नवनियुक्त कुलपती बिबेक देबरॉय यांनी दिले. त्यामुळे संस्थेत एकच खळबळ उडाली आहे. दैनिक 'पुढारी'ने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश यानिमित्ताने मिळाले आहे.

दै. 'पुढारी'ने सर्वप्रथम डॉ. रानडे हे कुलगुरुपदाची अर्हता पूर्ण करीत नसल्याचे वृत्त दिले होते. याच संस्थेतील प्रा. मुरली कृष्ण यांनी ही तक्रार विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पुराव्यासह ती महिन्यांपूर्वी केली होती.

हे प्रकरण 'पुढारी'ने उपल धरले. फौजदारी गुन्हे दाखल असलेले सव्र्व्हट्स ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख आणि डॉ. रानडे यांनी ही बाब दडवून ठेवत विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) फसवणूक कशी केली,

त्याचा पर्दाफाश केला. होता. त्यानंतर यूजीसीने २६ जून २०२४ रोजी डॉ. रानडे हे कुलगुरू पदासाठी पात्र नाहीत, त्यांची निवड यूजीसीच्या नियमानुसार न झाल्याने संस्थेची स्वायत्तता का काढून घेण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस संस्थेला पाठविली होती.

प्रिय डॉ. रानडे, तुम्हाला माहिती आहे की, माजी कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी २७ जून २०२४ रोजी तुम्हाला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसची तपासणी करण्यासाठी मी तथ्य शोध समिती स्थापन केली होती. या समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत, ज्यात १३ सप्टेंबर २०२४ रोजी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथे प्रत्यक्ष बैठक झाली समितीने या विषयावर तुमचे मतही ऐकले आहे. मला आता समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे जो मी संलग्न करत आहे. तथ्य शोध समितीने काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर असे मत मांडले आहे की, डॉ. अजित रानडे यांची उमेदवारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविलेल्या प्रस्थापित निकषांशी जुळत नाही. त्यामुळे त्यांना पुढे या पदावर काम करू देणे अक्षम्य आहे. कुलगुरूंची भूमिका, त्यांची नियुक्ती अशा पदासाठी आवश्यक कायदेशीर आणि नियामक निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरते. परिणामी, समिती डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याची शिफारस करते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक ऋ १-१ दि. २ जून, २०२३ पॅरा २३ऊ (४) नुसार, कुलगुरू आपल्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर कधीही, लिखित आदेशाद्वारे, अक्षमता, गैरवर्तन किंवा उल्लंघनाच्या कारणास्तव कुलगुरूंना पदावरून काढून टाकू शकतात. विनियम विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता आणि उच्च शिक्षणातील मानके राखण्यासाठी इतर उपाय) विनियम, २०१८ नुसार गेल्या अडीच वर्षांतील कुलगुरू म्हणून जीआयपीईने (गोखले इन्स्टिट्युट) केलेल्या तुमच्या भूमिकेचे कौतुक मला रेकॉर्डवर ठेवण्याची ही संधी घेऊ दे. ही खेदाची गोष्ट आहे की, परिस्थिती अशी आहे की, मला गोखले इन्स्टिट्यूट कुलपती म्हणून तुमच्याशी जास्त संवाद साधला नाही. हार्दिक शुभेच्छांसह, तुमचा विनम्र, बिबेक देबरॉय, कुलपती, (जीआयपीई) प्रत : डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई), बीएमसीसी रोड, डेक्कन जिमखाना, पुणे-४११००४, (महाराष्ट्र)

Here are the meta keywords in English for the provided headline:

"Gokhale Institute of Economics, renowned autonomous institute, Vice-Chancellor, Dr. Ajit Ranade, removal from post, investigation committee, disciplinary action, 14th September, inquiry report"

Feel free to ask if you need any changes!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news