प्रसाद जगताप
स्वारगेट मल्टिमोडल हबमध्ये मेट्रोने प्रवास करण्यासाठी येणार्या प्रवाशांसाठी मेट्रोकडून दोन मजल्यांचे पार्किंग उभारण्यात येत आहे. या पार्किंगमध्ये आपली वाहने पार्क करून प्रवाशांना थेट पिंपरी, कोथरूड (वनाज), रामवाडीपर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे रोजच्या कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
स्वारगेट मेट्रो स्थानक सुरू झाले असले, तरी येथेच असलेल्या मल्टिमोडल हबचे काम अजून सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होणार आहे. त्यात पीएमपी बस स्थानकाबरोबरच मेट्रो प्रवाशांसाठी दोन मजली पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मेट्रोने, पीएमपी बसने आणि मल्टिमोडल हबमधील दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना आपली वाहने सुरक्षितरीत्या पार्क करता येणार आहेत. यामुळे स्वारगेट परिसरातील रस्त्यांवर होणारी वाहन पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
कसबा पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांसाठी पार्किंगचे प्रोव्हिजन करण्यात आले आहे. सध्या या स्थानकांवर पार्किंग नाही. मात्र, आगामी काळात ते प्रवाशांसाठी उपलब्ध केले जाईल, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी सांगितले
मार्ग 1 : हिल व्ह्यू पार्क कारशेड, वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन, रुबी हॉल, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी.
मार्ग 2 : पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल, रेंजहिल डेपो, शिवाजीनगर, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट
02 कॉरिडोर
33.2 किलोमीटर मार्ग
30 स्टेशन
02 कोच देखभाल दुरुस्ती डेपो
1) पिंपरी-चिंचवड स्टेशन
2) संत तुकाराम महाराज स्टेशन
3) शिवाजीनगर
4) मंगळवार पेठ स्टेशन
5) सिव्हिल कोर्ट स्टेशन
6) वनाज डेपो
7) स्वारगेट
आमच्याकडून स्वारगेट मेट्रो स्थानकावर पार्किंगसाठीचे नियोजन सुरू आहे. येथे प्रवाशां साठी दोन मजली पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. मंडई, कसबा पेठ येथे पार्किंग नाही. तेथेही पार्किंगसाठी आगामी काळात नियोजन केले जाईल.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो