Domestic Violence: कौटुंबिक संघर्षात पुरुषही पीडित; तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ

15 महिन्यांत पुरुषांच्या एक हजार 75 तक्रारी भरोसा सेलकडे
Domestic Violence
कौटुंबिक संघर्षात पुरुषही पीडित; तक्रारींमध्ये लक्षणीय वाढFile Photo
Published on
Updated on

Domestic violence against men

महेंद्र कांबळे

पुणे: बदलत्या जीवनशैलीत निर्माण होणार्‍या कौटुंबिक वादात महिलांप्रमाणेच भरडल्या जाणार्‍या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मानसिक छळ, खोट्या आरोपांची भीती आणि नात्यांतील तडजोडीत त्यांचा सर्वाधिक बळी जाताना दिसत आहे.

पोलिसांच्या पुण्यातील ‘भरोसा सेल’कडे दाखल होणार्‍या तक्रारींमध्ये आता पुरुषांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पंधरा महिन्यांत कौटुंबिक त्रासाने ग्रासलेल्या हजारहून अधिक पुरुषांनी त्याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.

Domestic Violence
पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षितेत वाढ; डॉगस्कॉडसह शस्त्रधारी सुरक्षा जवानांची आता 24 तास गस्त

गेल्या वर्षी पुणे पोलिस आयुक्तालयाकडे कौटुंबिक वादाच्या 4,354 तक्रारी दाखल झाल्या, त्यांपैकी 3,504 तक्रारी महिला तक्रारदारांच्या होत्या, ज्याचे प्रमाण तब्बल 80.48 टक्के इतके आहे. दुसरीकडे 850 तक्रारी पुरुषांनी केल्या असून, त्याचे प्रमाण 19.52 टक्के आहे.

या आकडेवारीवर नजर टाकली, तर दर पाच तक्रारींपैकी एक तक्रार पुरुषाने केली असल्याचे आढळून येते. घरगुती वाद आणि मानसिक त्रास याबाबतीत महिलांचे प्रमाण जास्त असले, तरी पुरुषांनाही अन्याय सहन करावा लागत आहे. या तक्रारींपैकी 4124 तक्रारींचा निकाली निपटारा करण्यात आला, तर 230 तक्रारी प्रलंबित राहिल्या.

Domestic Violence
Bopdev Ghat Case: डीएनएसह शारीरिक सक्षमतेची होणार तपासणी; आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

विशेष म्हणजे चालू वर्षाच्या (2025) पहिल्या तीन महिन्यांत भरोसा सेलकडे एकूण 983 तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातही पावणे दोनशे पुरुषांच्या तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच, दर पाच तक्रारींपैकी जवळपास एक तक्रार पुरुष तक्रारदारांकडून आली आहे. विशेष म्हणजे, केवळ तीन महिन्यांत पुरुषांकडून तक्रारी दाखल होण्याचा आकडा लक्षणीय आहे आणि तो सातत्याने वाढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते.

अनेक प्रकरणांत पुरुषांना घरगुती हिंसाचार, खोटे आरोप, मानसिक त्रास यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. फारच बिकट परिस्थितीत पोहचल्यावर ते ’भरोसा सेल’चा दरवाजा ठोठावत आहेत. यापूर्वी पुण्यात एकच भरोसा सेल कार्यरत होता, ज्यामुळे उपनगरांतील तक्रारदारांना लांब प्रवास करावा लागत होता.

एकूणच महिलांसोबतच पुरुषांनाही समुपदेशन आणि न्याय मिळवून देण्यासाठी भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाचही पोलिस परिमंडळांमध्ये स्वतंत्र भरोसा सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या तक्रारींचा आणि लोकसंख्येचा विचार करता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील प्रत्येक परिमंडळात एक भरोसा सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या भरोसा सेलची जागा निश्चित करून हे सेल प्रत्येक परिमंडळात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

2025 मधील भरोसा सेलकडील आकडे

  • महिला तक्रारी (808/ 983) - 82.18 टक्के

  • पुरुष तक्रारी (175/ 983) - 17.82 टक्के

  • निकाली तक्रारी (481/ 983) - 48.93 टक्के

  • प्रलंबित तक्रारी (502/ 983) - 51.07 टक्के

2024 मध्ये भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारी

  • एकूण तक्रारी : 4354

  • महिला तक्रारी : 3504 (प्रमाण 80.48 टक्के)

  • पुरुष तक्रारी : 850 (प्रमाण 19.52 टक्के)

  • निकाली काढलेल्या तक्रारी : 4124 (प्रमाण 94.72 टक्के)

  • प्रलंबित तक्रारी : 230 (प्रमाण 5.28 टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news