मॉक पोलआधी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांचे होणार प्रशिक्षण

विधानसभेतील 10 पराभूत उमेदवारांची निवडणुकीवर हरकत
Pune News
मॉक पोलआधी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांचे होणार प्रशिक्षणFile Photo
Published on
Updated on

पुणे: विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत पराभूत झालेल्या जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी हरकत घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेसाठी मतदान यंत्र 45 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर मॉक पोल (प्रतिरूप) मतमोजणी लवकरच होणार आहे. या संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांचे सोमवारी (दि. 13) प्रशिक्षण होणार आहे. यानंतर या मतमोजणीचे वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे.

यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे महाविकास आघाडीच्या पराभूत 11 उमेदवारांनी अर्ज केला होता. यात शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे.

तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला होता. मात्र, बारामती विधानसभा मतदारसंघातील युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्राच्या तपासणी प्रक्रियेतूनच माघार घेतली. त्यामुळे आता 10 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

या हरकती दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यशदामध्ये सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण सोमवारी आयोजित करण्यात आले आहे. यात तपासणी व पडताळणी प्रक्रिया कशी करावी, या संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, तसेच पडताळणीसाठी अर्जही दाखल झाले आहेत, अशा ठिकाणी प्रतिरूप मतमोजणी न्यायालयाच्या निर्देशानंतरच केली जाणार आहे.

मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये केवळ आक्षेप अर्ज आलेले आहेत, अशा ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी हे केंद्रीय निवडणूक आयोग तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीकडे प्रतिरूप मतमोजणीसाठी माहिती सादर करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संमतीनंतर भेल ही कंपनी प्रतिरूप मोजणीचे वेळापत्रक तयार करणार आहे. हे वेळापत्रक सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल.

हरकत घेताना संबंधित उमेदवारांनी प्रतिरूप मोजणीवेळी उपस्थित राहणार्‍या मतदान प्रतिनिधींची नावे यापूर्वीच दिली आहेत. या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रतिरूप मोजणी केली जाणार आहे. दरम्यान, वेळापत्रक जाहीर झाल्याचे कळविताना संबंधित उमेदवारांना प्रतिरूप मोजणीच्या दिवसाच्या तीन दिवस आधी या प्रक्रियेतून माघार घेण्याची संधी देण्यात येणार आहे.

5 टक्के केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी होणार

प्रतिरूप मोजणी करताना संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी केली जाणार आहे. उमेदवाराकडून सुचविण्यात आलेली यंत्रे निवडण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news