Dilip Walse Patil Defamation Case: दूध भेसळ प्रकरणात बदनामी केल्यास १०० कोटींचा दावा; दिलीप वळसे पाटलांचा इशारा

‘दूध भेसळखोरांना कधीही पाठीशी घातले नाही’; डिंभे-माणिकडोह बोगदा, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रावरही भाष्य
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilPudhari
Published on: 
Updated on: 

मंचर: दूध भेसळ प्रकरणात आपल्याला 'आका' किंवा 'मास्टर माइंड' संबोधून गैरसमज निर्माण करणाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (दि. २६) सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. दूध भेसळखोरांना कधीही पाठीशी घातले नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

Dilip Walse Patil
Rakh Purandar Water Shortage: ऐन पावसाळ्यात राखमध्ये टँकरने पाणीपुरवठा; जलस्रोत आटल्याने वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दूध भेसळ प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या भूमिकेचे आपण स्वागत करतो, असे वळसे पाटील म्हणाले. कोणतेही प्रकरण दडपण्याचा प्रश्नच नाही. मात्र, या प्रकरणाशी आपला संबंध जोडून आरोप करणाऱ्यांना न्यायालयीन मार्गाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil
Ambegaon Potato Crop: आंबेगावच्या पूर्व भागात बटाटा पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव

डिंभे-माणिकडोह बोगद्याऐवजी डावा कालवा दुरुस्त केल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या बोगद्याला विरोध दर्शविणारे पत्र १० मार्च २०२१ रोजी तत्कालीन पाटबंधारेमंत्र्यांना दिले होते, असेही त्यांनी सांगितले.

Dilip Walse Patil
Pune Ganesh Visarjan Crowd Management: पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन महत्त्वाचे; पोलिस आयुक्त

पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेमुळे आंबेगावातील ५२ आणि जुन्नरमधील ३३ गावांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्राकडे हरकत नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या व्यवहारांबाबत तसेच तालुक्यातील सावकारीच्या तक्रारींबाबतही दखल घेतली जाईल, असे वळसे पाटील यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news