Pune Journalist Molestation Case: ढोल पथकातील वादकांकडून पत्रकार महिलेचा विनयभंग; सहकारी पत्रकाराला मारहाण

ही घटना शनिवारी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घडली.
Molestation Cases Pune
ढोल पथकातील वादकांकडून पत्रकार महिलेचा विनयभंग; सहकारी पत्रकाराला मारहाण(File Photo)
Published on
Updated on

Dhol Pathak members molest woman journalist

पुणे: ढोल-ताशा पथकातील वादकाने एका महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन केले. तसेच, तिच्या सहकारी पत्रकाराला मारहाण केली. यात तो रस्त्यावर पडला. त्याचा चष्मा यात तुटला. डोळा थोडक्यात वाचला. याप्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाणे येथे लेखी तक्रार दिली आहे. तसेच, पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष या विषयाकडे वेधले. ही घटना शनिवारी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पत्रकार आणि त्यांचा सहकारी वार्तांकनासाठी तेथे उपस्थित होते. त्या वेळी त्रिदल पथकातील काही सदस्यांनी महिलेच्या मार्गात अडथळा आणला. त्यानंतर त्यांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. महिलेने विरोध केला असता त्यांना धमकाविण्यात आले. ही घटना घडल्यानंतर महिला पत्रकाराने जवळच उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्‍याला घटनेची माहिती दिली. (Latest Pune News)

Molestation Cases Pune
Vighnaharta Nyas Help: ...जेव्हा अपघातग्रस्तांच्या मदतीला विघ्नहर्ता न्यास धावून जाते!

मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. थोड्या वेळाने त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. दरम्यान, याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले की, आम्ही संबंधित तरुणीशी संपर्क केला असून, त्यांना तक्रार दाखल करण्यास बोलाविले आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तर, याबाबात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news