

आळंदी: आळंदी शहारा जवळ मरकळ रोड, धानोरे फाटा येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बुधवारी (दि.१७) रोजी पहाटे तीन वाजता भीषण आग लागली होती ही आग आटोक्यात आणण्यात आळंदी नगरपरिषद, पीएमआरडीए, पीसीएमसी अग्निक्षामक दलाला यश आल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे.
कंपनीमध्ये आगी दरम्यान स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरत होती. परिणामी अग्निशमन दलांकडून फोम मारा करून आग आटोक्यात आणली गेली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. सदर आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
आग विझविण्यात आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या विनायक सोळंकी, प्रसाद बोराटे, पदमाकर श्रीरामे, अक्षय त्रिभुवन, कोळपे तुळशीराम या कर्मचाऱ्यांनी तसेच पीएमआरडीए व पीसीएमसी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले केमिकल व इतर सर्व बाबींचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.