

Alandi News: पीठसाखर,लिंबु आणि गरम पाण्याची धार घालत माउलींचा कार्तिकी वारीतील शिनवटा घालवण्यासाठी भाविकांनी माऊली मंदिरात गर्दी केली होती. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला परंपरेनुसार संत.ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर सकाळी भाविकांच्या प्रशाळपूजा संपन्न झाल्या.त्यानंतर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.राजेंद्र उमाप यांचे हस्ते पवमान अभिषेकपूजा करण्यात आली. मानकऱ्यांना देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
संत.ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. हा सोहळा अमवास्ये पर्यंत चालत असतो त्यांनंतर सात दिवसांनी प्रशाळ पूजा पार पडत असते. यावेळी भाविक समाधीवर पाणी घालत माऊलींचा एक प्रकारे थकवा घालवत असतात यासाठी आवर्जून भाविक आळंदीत येत असतात. कार्तिकीत अनेक भाविकांना माऊलींच्या मुखदर्शनावर समादान मानावे लागते. प्रशाळ पूजे निमित्ताने त्यांचे स्पर्शदर्शन झाल्याने एक प्रकारचे समादान भाविकांच्या नजरेत यावेळी दिसून येत होते.