

पुणे : राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाल्याने विजेची मागणी तब्बल ५ हजार मेगावॅटने वाढली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेने दिवस-रात्र पंखे व कुलर सुरू ठेवल्याने हा भार महावितरणवर पडला आहे. ते २२ हजार मेगावॅट इतकी विजेची गरज भासते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात साधारणपणे १००० ते १२०० मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज वापरली जात होती. मात्र, यंदाचा उन्हाळा महाउष्ण असल्याने २४ तास पंखे आणि कुलरचा वापर सुरू आहे.
प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांत ही मागणी जवळपास दुपटीने वाढली आहे; कारण यंदा मार्च ते एप्रिल असे सलग ६० दिवस उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचा पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारी २०२४ पासूनच विजेची मागणी वाढली आहे. मार्च महिन्यात ती १५०० मेगावॅटवर पोहोचली होती. एप्रिल महिना सुरू होताच ती २००० ते २२०० मेगावॅटवर पोहोचली. ३० एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विजेची मागणी वाढली असून, ती २४ हजार ८६० मेगावॅटवर गेली आहे. पुढील काही दिवसांत ती आणखी एक ते दीड हजार मेगावॅटने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
इतर: १४०८
एकूण : २३,९९३ मेगावॅट
हेही वाचा