

D.El.Ed Result Declared
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जूनमध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षण पदविका (डीएल.एड.) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. पाच माध्यमांसाठी झालेल्या या परीक्षेचा निकाल 64.75 टक्के लागला असून, नऊ हजार दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत 3 ते 12 जून या कालावधीत डीएल.एड. अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 13 हजार 902 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 526 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यात मराठी माध्यमाचे सहा हजार 253 (62.77 टक्के), इंग्रजी माध्यमाचे 848 (63.71 टक्के), उर्दू माध्यमाचे एक हजार 661 (71.66 टक्के), हिंदी माध्यमाचे 210 (80.15 टक्के), कन्नड माध्यमाचे 30 (100 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकाल http://www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक महाविद्यालयामार्फत हस्तपोच मिळेल. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुणपडताळणी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २०/०८/२०२५ आहे. दि. २०/०८/२०२५ या दिनांकानंतर
प्राप्त झालेल्या अर्जाचा (दि. २०/०८/२०२५ पूर्वीच Online Payment Gateway द्वारे शुल्क अदा केलेले असले
तरीही) विचार करण्यात येणार नाही. तसेच दि. २०/०८/२०२५ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचे भरलेले शुल्क
कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.