दिवसाढवळ्या घरफोडी ; सुमारे बत्तीस तोळयाचे दागिने केले लंपास

एक लाख रुपये केले लंपास
Daylight Burglary
दोन तरुण चोरी करताना आढळून आले
Published on
Updated on

चोरट्यांनी सोमवारी (दि. 19) दुपारी दीड वाजता येथील नारायणगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय दयानंद पाटे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील सुमारे बत्तीस तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून त्यानुसार दोन तरुण चोरी करताना आढळून आले आहेत. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

नारायणगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटे यांचा येथील खोडद रस्त्यालगत बंगला आहे. नारायणगाव येथे त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे.रक्षाबंधन सण असल्याने कुटुंबातील महिला बाहेरगावी गेल्या होत्या. तर घरातील पुरुष सदस्य सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बंगल्याला कुलूप लावून किराणा मालाच्या दुकानात गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या कंपाउंड वरून उडी मारून आवारात प्रवेश केला. दरवाज्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. तसेच कपाटाचेही लॉकर तोडून सुमारे बत्तीस तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

अवघ्या वीस मिनिटात लांबवला ऐवज 

चोरट्यांनी अवघ्या वीस मिनिटात चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून स्पष्ट झाले आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अभय पाटे यांचे कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली. आज(दी. 20)सकाळी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान नागपंचमीचा सण असल्यामुळे कुटुंबातील महिलांनी दागिने घरी आणून ठेवले. व सनसुधी झाल्यावर ते पुन्हा दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवणार होते. परंतु मधल्या काळातच या दागिन्यांवर डल्ला मारला. बहुदा घर बंद आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्य पुण्याला गेले आहेत. तसेच कुटुंबातील काही सदस्य एका कार्यक्रमाला गेले आहेत. दिवसभर कुणी घरी येणार नाही याबाबतची माहिती या चोरट्यांना असावी. किंवा कोणीतरी पाळत ठेवून ही चोरी केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news