दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात

दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात
Published on
Updated on

पुणे : नाशिकमधील पार्टीमुळे चर्चेत आलेला दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख ऊर्फ सलीम कुत्ता गेल्या सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात असून, या कालावधीमध्ये एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या कथित सहभागाची सादर केलेली ध्वनिचित्रफीत 2016 पू- र्वीची आहे का, असा सवाल उपस्थित झाला.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय; तुरुंग प्रशासनाची माहिती त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो दहा दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. संबंधित ध्वनिचित्रफीत त्यावेळची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कुत्ता 2016 पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. या काळात त्याची एकही दिवस कारागृहातून मुक्तता झाली नाही. त्याची मुलगी आणि जावई 2020 मध्ये अधिकृत परवानगी घेऊन त्याला भेटले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.

मूळचा तामिळनाडूतील सलीम हा मूळचा तामिळनाडूमधील तंजावरमधील कुट्टा गावाचा रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी तो ९० च्या दशकात मुंबईत आला होता. तेथे तो दाऊद टोळीतील गुंड महंमद डोसा याच्या ओळखीतून दाऊदच्या संपर्कात आला. त्याच्याविरुद्ध पायधुणी, कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचे तपासात आढळून आल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news