Daund Khore New Village Panchayats: खोर भागात दौंड तालुक्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची भर

नव्या गावांमध्ये पहिल्या सरपंचपदासाठी उमेदवारांची तयारी, नागरिकांमध्ये उत्सुकता
Gram Panchayat
Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

खोर: दौंड तालुका येथील ग््राामविकासाच्या प्रवासात गेल्या वर्षभरात महत्त्वपूर्ण बदल घडले असून, विविध गावांच्या प्रशासकीय विभाजनामुळे तालुक्यात पाच नव्या ग््राामपंचायतींची भर पडली आहे. एक वर्षापूर्वी तालुक्यात 81 ग््राामपंचायती अस्तित्वात होत्या; मात्र, नव्या रचनेनंतर ही संख्या आता 86 वर पोहोचली आहे.

Gram Panchayat
Sunil Tatkare Ajit Pawar Memory: बारामतीत सुनील तटकरे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन

तालुक्यातील काही मोठ्या ग््राामपंचायतींचे कार्यक्षेत्र विस्तृत असल्याने प्रशासन सुलभ व्हावे आणि विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने विभाजनाचा निर्णय घेण्यात आला. गार गावाचे विभाजन होऊन गार, नवीन गार व बेटवाडी अशा तीन स्वतंत्र ग््राामपंचायती अस्तित्वात आल्या. हिंगणीबेर्डी ग््राामपंचायतीचे विभाजन होऊन हिंगणीबेर्डी व काळेवाडी या दोन स्वतंत्र ग््राामपंचायती स्थापन झाल्या, तर कासुर्डी ग््राामपंचायतीचे विभाजन होऊन कासुर्डी, कामठवाडी व जावजीबुवावाडी अशा स्वतंत्र ग््राामपंचायतींची निर्मिती झाली. या प्रक्रियेमुळे तालुक्यातील स्थानिक प्रशासनाची पुनर्रचना झाली असून, नव्या ग््राामपंचायतींमुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवर अधिक परिणामकारक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Gram Panchayat
Parinche Embryo Transfer Project: देशी गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण प्रकल्पाने वाढवली दूध उत्पादन क्षमता

पहिल्या सरपंचपदाची उत्सुकता

नव्या ग््राामपंचायती अस्तित्वात आल्यानंतर आता सर्वांचे लक्ष पहिल्या सरपंचपदावर कोण विराजमान होणार याकडे लागले आहे. ‌‘पहिला गाव कारभारी‌’ होण्याचा मान कोणाला मिळणार, याबाबत गावागावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. नव्या गावांमध्ये राजकीय समीकरणे नव्याने जुळवावी लागणार असून, इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मतदारसंघांची रचना बदलल्याने अनेकांना नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने संपर्क साधावा लागत आहे. वार्डरचनेतही बदल अपेक्षित असल्याने आगामी ग््राामपंचायत निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news