अरबी समुदात (Arabian Sea) 'असना' (Cyclone Asna) नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. याचा केंद्रबिंदू गुजरातच्या किनारपट्टीवर आहे त्यामुळे प्रामुख्याने कच्छ किनारपट्टीला सावधानतेचा रेड अलर्ट दिला आहे. ऑगस्ट मध्ये सुमारे 132 वर्षानंतर हे चौथे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होत आहे.त्यामुळे महाराष्ट्राला धोका मात्र नाही परंतु पावसाचा जोर किंचित वाढणार आहे त्यामुळे 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यत मुसळधार पावसाचा अंदाज करण्यात आला आहे.
गुजरात आणि पश्चिम बंगालच्या किनार पट्टीवर एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सून वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. गुजरात किनारपट्टवर 24 तासापासून कमी दाबाचा पट्टा कायम असून आज शुक्रवारी सायंकाळी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल.याचा परिणाम 1 सप्टेंबर पर्यन्त राहणार आहे.गुजरात किनारपट्टीकडून ते ओमान देशाकडे जाईल असा अंदाज आहे.या वादळाला पाकिस्तान ने 'असना' हे नाव दिले आहे.
या वादळाची तीव्रता वाढली तर त्याला असना हे उर्दू नाव असून ते पाकिस्तान च्या हवामान विभागाने सुचवले आहे. असना म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा असा आर्थबोध होतो.हिंदी महासागरात जे कुठले वादळ येते त्याला आशियाई देश आळी-पाळीने सुचवत असतात.त्यानुसार त्याची नोंद जागतिक हवामान संघटना नोंद घेते.
अरबी समुद्रात ऑगस्ट महिन्यात खूप कमी चक्रीवादळे तयार झाली आहेत.यात सण 1891 ते 2023 या 132 वर्षांच्या काळात अरबी समुद्रात फक्त तीन चक्रीवादळे तयार झाली ती 1944, 1964 आणि 1976 मध्ये चक्रीवादळ तयार झाले होते. त्यानंतर थेट 2024 मध्ये हे चक्रीवादळ तयार होत आहे.त्या उलट बंगालच्या उपसगरात ऑगस्ट महिन्यात 28 चक्रीवादळे तयार झाली आहेत.
हे चक्रीवादळ वायव्य बंगालच्या उपसागरात तयार होत आहे तेथून गुजरातची कच्छ आणि सौराष्ट्र ही किनारपट्टी जावळ आहे.त्यामुळे या भागात गुरुवार पासून अतिवृष्टी सुरू झाली आहे.शुक्रवारी खूप मोठ्या पावसाचा अंदाज आहे.
हे वादळ पश्चिमेकडे सरकून कच्छपासून ईशान्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे.शेजारील सौराष्ट्र आणि पाकिस्तान किनारपट्टीवरबागामी 12 तासांत चक्रीवादळात रूपांतरीत होईल.
30 ऑगस्ट सायंकाळी 7 नंतर वादळाचा वेग ताशी 50 ते 55 किमी (तीव्र कमी दाबाचा पट्टा)
31 ऑगस्ट सकाळी: ताशी 70 ते 75 की मी वेग वाढून चक्रीवादळ वादळात रुपांतर
31ऑगस्ट दुपार ते रात्री पर्यन्त:वादळाचा वेग ताशी 80 ते 85 की.मी.होईल.
1 सप्टेंबर सकाळी: वेग कमी होत ताशी 50 ये 55 की.मी.वर येईल,वादळ ओमान च्या दिशेने जाईल.