

दौंड : दौंड शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयावरून रागाच्या भरात कोयत्याने सपासप वार करून प्रवीण पवार याचा खून करण्यात आला.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल उर्फ नन्या थोरात याला आपल्या आईचे प्रवीण पवार यांचेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून याचा राग मनात धरून त्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून पवार यांचा खून केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाल पवार हे करत आहेत. (Latest Pune News)