Crude oil investment fraud Pune: गुंतवणुकीच्या आमिषाने 6 कोटींची फसवणूक; आरोपी बहीण-भाऊ, नातेवाईकांसह चार जणांवर गुन्हा

याप्रकरणी चार जणांविरोधात बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

पुणे: क्रूड ऑईल कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन महिन्यांत 43 कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कालिदास तुकाराम गुजर (वय 45, रा. भूमकर चौक, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पूनम महादेव शेळके, विनायक महादेव शेळके (दोघे रा. आंबेगाव), इंद्रजितसिंग उप्पल (रा. लुधियाना, पंजाब) आणि सौरभ चक्रवर्ती (रा. दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 मे 2025 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली.

Fraud Case
Pune Politics: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजपविरुद्ध तक्रारींचा पाढा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आढावा बैठक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुजर हे आर्यन सिक्युरिटीज कंपनीमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर शेखर आणि सोनल गोरे हे कंपनीचे संचालक असून, विशाल माने हे व्यवस्थापक आहेत. आरोपी पूनम आणि विनायक शेळके हे गोरे आणि माने यांचे नातेवाईक असल्याने त्यांची कंपनीत नेहमी ये-जा होती.

आरोपींनी क्रूड ऑईलचा मोठा व्यवसाय असून, त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळतो, असे सांगितले. त्यानंतर आर्यन सिक्युरिटीज कंपनीच्या वतीने आरोपींवर विश्वास ठेवून 2 कोटी 94 लाख 84 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

Fraud Case
Dairy Cooperative Scheme: ... तर सरदार पटेल को-ऑप. मिल्क फेडरेशन दूध संस्था काढतील; राज्यात 985 नवीन प्राथमिक दूध संस्था काढण्याचे उद्दिष्ट

मात्र, वारंवार मागणी करूनही आरोपींनी पैसे परत केले नाहीत. यानंतर पूनम आणि विनायक यांनी सौरभ व इंद्रजित यांना आर्यन सिक्युरिटीज कंपनीत आणले. त्यांच्या ‌‘व्हिजर ॲरिक्स‌’ कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दोन महिन्यांत 43 कोटी रुपयांचा नफा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून आर्यन सिक्युरिटीज कंपनीच्या वतीने पुन्हा 2 कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, ही रक्कमही परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news