पुणे : पुढारी ऑनलाईन
शरद पवार यांच्या चेहऱ्यावरून सदाभाऊ खोत यांनी कालच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर अजित पवारांनी सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर आज संताप व्यक्त केला. टीका करण्याची एक पद्धत असते. सदाभाऊंची टीका करण्याची पद्धत चुकीची आहे. सदाभाऊ खोतांना फोन करून बोललो. त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात मी निषेध केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. वडिलधाऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य महाराष्ट्र सहन करत नसल्याचं अजित पवार म्हणाले.
दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेनंतर सदाभाऊ खोतांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचं समोर येत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यावर आक्रमक झाले असून, सदाभाऊ खोतांचे सर्व कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. जत मधील सभेत देवेंद्र फडणवीसांसमोर सदाभाउ खोतांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी पडळकरही उपस्थित होते.