पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेव्हण्याच्याच मुलाने भांडणाचा राग मनात धरून घराचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, फर्निचर तसेच दोन दुचाकींची तोडफोड करून 50 हजार रुपये चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि.14) चिखलीतील ताम्हाणेवस्ती येथे घडली. याप्रकरणी बापूराव यशवंता ठोंबरे (वय 67, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी समाधान बाळू महानवर (वय 24, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याविरुदद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बापूराव मंगळवारी (दि.14) घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. सोमवारी (दि.13) झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी बापूराव यांच्या मेहुण्याचा मुलगा समाधान याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच, घरातील टीव्ही, फर्निचर आणि दोन दुचाकींची तोडफोड केली. खिडकीच्या काचा फोडून कपाटामधील 50 हजार रुपये
घेऊन गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा