Crime News : गोपनीय माहितीनेच केला घात! झाली मोठी फसवणूक

file photo
file photo
Published on
Updated on

पिंपरी : क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन एकाची 33 हजार 917 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बालाजी कॉलनी, चिंचवड येथे घडली. राजेश लक्ष्मण भरगुडे (41, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन केला. फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून 33 हजार 917 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news